...अखेर जामीन घेतला


  • ...अखेर जामीन घेतला
  • ...अखेर जामीन घेतला
SHARE

भोईवाडा - "जोपर्यंत खड्डे बुजवण्यात येत नाहीत, तोपर्यंत जामीन घेणार नाही", अशी भूमिका देणारे मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी अखेर सोमवारी जामीन घेतला.

खड्डे आंदोलनप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी हे शनिवारी पोलिसांसमोर हजर झाले होते. यावेळी शिवाजी पार्क पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. दरम्यान, शनिवारी वरळी रात्र न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
"खड्डे बुजवले जात नाहीत, तोपर्यंत जामीन घेणार नाही", असा इशारा देशपांडे आणि धुरी यांनी दिला होता. परंतु महापालिकेने लक्ष घालून गेल्या दोन दिवसांत मुंबईतील अनेक खड्डे बुजवून घेतल्यामुळे मनसेचे खड्यांविरोधातील आंदोलन यशस्वी झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आज सोमवारी भोईवाडा कोर्टात मनसे नगरसेवक संतोष धुरी आणि गटनेटे संदिप देशपांडे यांनी जामीन स्वीकारला. यावेळी कोर्टाबाहेर मनसे समर्थकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या