Advertisement

मनसेकडून जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप


मनसेकडून जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र वाटप
SHARES

लोअर परळ - मनसेच्या वरळी विधानसभा प्रमुख बंटी म्हशीलकर आणि मनसे 191 चे शाखा प्रमुख उत्तम सांडव यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांना मोफत ओळख पत्र वाटप करण्यात आलं. पालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलीय. त्यामुळेच मनसेचा हा स्टंट असल्याचं बोललं जातंय. हा कार्यक्रम लोअर परळ येथे तुळसी पाईप मार्गावरील विठ्ठल रखुमाई मंदिराच्या आवारात पार पडला. जेष्ठ नागरिकांना ओळखपत्राबाबतीत ‘मुंबई लाइव्ह’कडून विचारण्यात आलं तेव्हा, " ओळख पत्र मोफत वाटप निवडणुका आल्यात म्हणून करत आहेत. निवडणुका संपल्या की जेष्ठ नागरिकांना कोणी विचारत नाही, असं नारायण सुर्वे स्थानिक जेष्ठ नागरिक यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा