Advertisement

‘मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये’, राम कदमांना खोपकरांचा इशारा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य करणारे भाजप नेते राम कदम (bjp leader ram kadam) यांची मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांनी ट्विटरवरून चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

‘मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये’, राम कदमांना खोपकरांचा इशारा
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (mns) शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वक्तव्य करणारे भाजप नेते राम कदम (bjp leader ram kadam) यांची मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांनी ट्विटरवरून चांगलीच खरडपट्टी काढली आहे. मनसेच्या जीवावर मोठे झालेल्यांनी आम्हाला शिकवण्याचा आगाऊपणा करू नये, असा इशाराही खोपकर यांनी दिला आहे.  

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना इशारा देणारं पोस्टर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) वतीने मुंबईतील वर्सोवा भागात लावण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते राम कदम यांनी मनसेची शिवसेनेसोबत तुलना केली होती. 

हेही वाचा- राज ठाकरेंनी 'या' कारणासाठी केलं मोदी सरकारचं कौतुक

वर्सोव्यातील बांगलादेशी घुसखोरांना (illegal bangladeshi and pakistani) ‘मनसे’ इशारा, तुमच्या देशात निघून जा’ अशा शब्दांत घुसखोरांना या पोस्टरवरून इशारा देण्यात आला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राम कदम (ram kadam) म्हणाले, शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (bal thackeray) हे नेहमीच आपल्या भाषणात बांग्लादेशी लोकांना हाकलून द्या असं म्हणत होते. जी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती. ती आता मनसेच्या रुपाने पुढे येत आहे.

त्यावर अमेय खोपकर (amey khopkar) यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मनसेच्या जीवावर मोठे होऊन ज्यांनी मनसेला ‘रामराम’ ठोकला आणि बेडूकउड्या मारुन दुसऱ्या पक्षाची लाचारी सुरु केली त्यांनी मनसेला शिकवण्याचा आगाऊपणा करु नये. पा’दरे’ पावटेंच्या इशाऱ्यांना आपण अजिबातच भीक घालत नाही आणि त्यांच्या सल्ल्याची राजसाहेब आणि आम्हाला काडीचीही गरज नाही”. 

विचारधारा वगैरे शब्द दरेकरांच्या तोंडी शोभत नाहीत. सत्तेची ऊब ज्यांना सतत हवीहवीशी वाटते आणि त्यासाठी कसल्याही तडजोडी करण्याची तयारी असते त्या दरेकरांनी विचारधारेवर बोलणं हा आजचा सर्वात मोठा विनोद आहे.

हेही वाचा- घुसखोरांना हाकलण्याचं उगाच श्रेय घेऊ नका, उद्धव ठाकरेंचा मनसेला टोला

“राम कदम यांना जुने दिवस आता कदाचित आठवत नसतील. पण जेव्हा हे मनसेमध्ये होते, तेव्हासुद्धा बाळासाहेबांवर आमची नितांत श्रद्धा होती आणि आजही आहे. मनसे आता शिवसेनेच्या मार्गावर आहे वगैरे बोलून आपली अक्कल पाजळू नका. कोण सत्तेच्या मागावर आहे हे आम्ही पुरेपूर ओळखून आहोत,” असंही अमेय खोपकर म्हणाले आहेत.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा