Advertisement

राज ठाकरेंनी 'या' कारणासाठी केलं मोदी सरकारचं कौतुक

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टच्या (shree ram janmabhoomi trust) स्थापनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती ​पंतप्रधान नरेंद्र मोदी​​​ यांनी लोकसभेत दिली.

राज ठाकरेंनी 'या' कारणासाठी केलं मोदी सरकारचं कौतुक
SHARES

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टच्या (shree ram janmabhoomi trust) स्थापनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. या निर्णयाचं कौतुक करत महाराष्ट्र नवनिमाण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (mns chief Raj thackeray) यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं आहे. मोदी सरकारचं कौतुक करण्याची ही राज ठाकरे यांची दुसरी वेळ आहे. याआधी त्यांनी सुधारीत नागरिकत्व कायदा (caa) आणल्याबद्दल भाजप सरकारचं कौतुक केलं होतं. 

हेही वाचा- मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

अयोध्येतील राम मंदिर उभारणीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळ (cabinet meeting) बैठकीत झालेल्या निर्णयांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी लोकसभेत वाचन केलं. या निर्णयानुसार राम मंदिर उभारण्यासाठी स्वतंत्र श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती संपूर्णपणे स्वायत्त ट्रस्ट असेल. तसंच, राम मंदिराची निर्धारित जागा ही सरकारकडून तिर्थक्षेत्र समितीकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राम मंदिर (ram mandir) उभारण्यासाठी योजना करण्यात येईल. राम मंदिराबाबतचे यापुढील सर्व निर्णय ही समिती स्वतंत्रपणे घेईल. ही समिती अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर निर्माण व संबंधित विषयांवर निर्णय घेण्यासाठी असेल, असं मोदींनी सांगितलं.  

त्यावर राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटरवर टाकलेल्या एका पोस्टमध्ये ते म्हणतात, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज 'श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र' ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचं मनापासून अभिनंदन. 

हेही वाचा- हे माझं हिंदुत्व नाही, मुख्यमंत्र्यांत्र्यांचा भाजपला टोला

याआधी मनसेच्या महाअधिवेशनात केलेल्या भाषणामध्ये राज ठाकरे (raj thackeray) यांनी देशात बेकायदेशीररित्या राहणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हाकलून लावण्यासाठी सुधारीत नागरिकत्व कायदा (caa) आणल्याबद्दल मोदी सरकारचं अभिनंदन केलं होतं. 


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा