Advertisement

आमदार निवास बांधण्याऐवजी कोविड मृतांच्या नातेवाईकांना पैसे द्या- बाळा नांदगावकर

नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल, परंतु त्याच पैशांतून कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

आमदार निवास बांधण्याऐवजी कोविड मृतांच्या नातेवाईकांना पैसे द्या- बाळा नांदगावकर
SHARES

नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल, परंतु त्याच पैशांतून कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्या मृताच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्याची आवश्यकता आहे, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) नेते बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

यासंदर्भात मत व्यक्त करताना बाळा नांदगावकर म्हणाले, कोरोनाने अनेक परिवार उध्वस्त केले आहेत. यातील अनेकांची आर्थिक स्थिती देखील हलाखीची आहे. त्यामुळे त्यांना कोरड्या सहानुभूतीची नव्हे, तर भरीव मदतीची आवश्यकता आहे. नियोजित आमदार निवास कधीही बनवता येईल. परंतु तेवढ्याच खर्चात (९०० कोटी) मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपये देता येतील व ते देणं उचित ठरेल, अशाने त्यांना खरंच मोठा आधार मिळेल.

हेही वाचा- सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासाबाबत मनसेनं राज्य सरकारला सुचवला पर्याय

महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच महापालिका या श्रीमंत आहेत. अनेकांकडे हजारो कोटींच्या ठेवी आहेत. हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेच्याच कामाला आला पाहिजे. कोरोनामुळे (coronavirus) ज्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या घरच्यांना यावर्षी घरपट्टी माफ करणं गरजेचं आहे. सर्वच स्थानिक संस्थांनी हे त्वरित करून सामान्य जनतेला दिलासा द्यावा. राज्य सरकार ने सरसकट तसा आदेशच दयायला हवा. सरकारने / म्हापलिकांनी जनतेप्रति आपली जबाबदारी झटकू नये, असं आवाहन देखील बाळा नांदगावकर यांनी केलं आहे.

आर्थिक हालाखी

एका बाजूला कोविडचं संकट तर दुसऱ्या बाजूला लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांची अक्षरश: दैना झाली आहे. जगण्याचं आर्थिक गणित कोलमडून पडलं आहे. त्यामुळे नोकरदार आणि दुकानदार अशी सर्वांकडूनच लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याची मागणी केली जात आहे. येत्या १ जून रोजी सध्या सुरू असलेल्या लाॅकडाऊनची मुदत संपत आहे. त्यामुळे राज्य सरकारने देखील यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. 

राज्यातील कोरोनाची स्थिती आटोक्यात असल्याने ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अधिक आहे, असे जिल्हे वगळून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी असलेल्या जिल्ह्यातील लाॅकडाऊनसंदर्भातील निर्बंध कमी होण्याची शक्यता आहे. तसे संकेत सरकारमधील सर्वच मंत्र्यांकडून मिळत आहेत.

(MNS leader bala nandgaonkar demands to provide financial aid to dead covid 19 patients relative in maharashtra)

हेही वाचा- लहान मुलांमधील संसर्गाबाबत बेसावध राहू नका, वेळीच डॉक्टरला दाखवा- उद्धव ठाकरे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा