Advertisement

अधिवेशनाच्या काळातच कोरोना कसा वाढतो?, मनसेचा खणखणीत सवाल

केवळ विधीमंडळ अधिवेशन टाळण्यासाठी सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याची आकडेवारी दाखवली जात आहे का?, असा खळबळजनक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

अधिवेशनाच्या काळातच कोरोना कसा वाढतो?, मनसेचा खणखणीत सवाल
SHARES

केवळ विधीमंडळ अधिवेशन टाळण्यासाठी सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याची आकडेवारी दाखवली जात आहे का?, असा खळबळजनक सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी उपस्थित केला आहे. तसंच मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नांवर बोलत नाहीत, असा आरोपही देशपांडे यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीवर खरपूस टीका केली. ते म्हणाले, ८ दिवसांमधील राज्यातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ लक्षात घेऊन लॉकडाऊनसंदर्भातील निर्णय घेण्यात येईल, असा इशारा रविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिला. मात्र राज्यातील ठाकरे सरकार हे जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवून अधिवेशनापासून पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे.

बरोबर अधिवेशनाच्या काळामध्येच कोरोना कसा वाढला? कोरोना राष्ट्रवादीच्याच लोकांना का होतो?, शेतकऱ्यांचं एवढं मोठं आंदोलन सुरु असताना तिकडं कोरोनाचा फैलाव का नाही झाला? की फक्त महाराष्ट्रात कोरोना येतो? एवढे महिने बसमध्ये चेंगराचेंगरीत लोकं जातात तेव्हा नाही झाला कोरोनाचा फैलाव. पेट्रोल दरवाढीविरोधात आंदोलन केलं तेव्हा नाही झाला फैलाव?, असे अनेक प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले.

हेही वाचा- तर लाॅकडाऊन अटळ! महापालिका आयुक्तांनी दिला निर्वाणीचा इशारा

लोकांना घाबरवण्यासाठी हे धंदे सुरु आहेत का?  हे सगळं प्लॅनिंग करुन सुरु आहे. अमरावतीमध्ये कुठेतरी कोरोना (coronavirus) चाचण्या वाढवून रुग्णांची संख्या वाढलेली दाखवायची. या प्रसाराला लोकंच जबाबदार आहे दाखवायला मार्शलला कारवाई करायला लावली आहे. पाणी प्यायला लोकं मास्क खाली घेतात तरी ते कारवाई करतात.

अधिवेशन काळामध्ये मोर्चे घेऊन अनेकजण सरकारपुढे मागण्या मांडतात. मात्र राजकीय मोर्चांवर बंदी घालून आम्हाला प्रश्न विचारायचे नाही अशी सरकारची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांना घरात लपून बसायचं आहे. अधिवेशनात लोकांच्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत म्हणून सरकार लॉकडाऊनची धमकी देऊ लागलं आहे.

वीज बिलांवर एवढं आंदोलन सुरु असताना मुख्यमंत्री त्यावर काहीच बोलत नाहीत. नीती आयोगाला सांगता कार्यालयीन वेळा बदला, तुम्ही मंत्रालयाच्या वेळा का नाही बदलत? तुम्ही लोकांना सांगता मी काय बोलतो तुम्हाला ऐकू येत आहे, पण तुम्ही काय बोलता मला ऐकू येत नाही. हे काय चालवलं आहे? ही कुठल्या पद्धतीची लोकशाही आहे?, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे.

(mns leader sandeep deshpande raised questions over increasing covid 19 patients tally in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा