Advertisement

महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) फेरीवाला धोरणाला (hawkers policy) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) विरोध केला आहे

महापालिकेच्या फेरीवाला धोरणाविरोधात मनसेचा मोर्चा
SHARES

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) फेरीवाला धोरणाला (hawkers policy) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) विरोध केला आहे. फेरीवाला धोरणाविरोधात गुरूवारी नितीन सरदेसाई ( Nitin Sardesai) यांच्या नेतृत्वात  मोर्चा काढण्यात आला. मनसेचं मुख्यालय असलेल्या राजगड (rajgad) पासून काढलेल्या मोर्चात शेकडो मनसैनिक सहभागी झाले होते. यावेळी मनसैनिकांनी महापालिकेने आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. राजगड ते जी वॉर्डपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) नव्या फेरीवाला धोरणानुसार (hawkers policy), फेरीवाल्यांना बसण्यासाठी काही ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्यात मनसेचं मुंबईतील मुख्यालय राजगडच्या  (rajgad) समोरील फुटपाथचाही समावेश आहे. येथे १०० फेरीवाले बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मनसेने फेरीवाला (hawkers) धोरणाचा विरोध केला आहे. 

यावेळी नितीन सरदेसाई यांनी सांगितलं की, मुंबई महापालिकेत  (Mumbai Municipal Corporation) शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचा मनमानी कारभार सुरू असून फेरीवाला धोरणही त्याचाच एक भाग आहे. केवळ राजगड समोरच फेरीवालं बसत आहेत, हे एकच या मोर्चामागील कारण नाही. प्रशासनाने नागरिकांना, सर्वसामान्य रहिवाशांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही या धोरणाचा निषेध करत आहोत. राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर फेरीवाले बसविण्याचं कारण काय? असा प्रश्नही त्यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे. जोपर्यंत या निर्णयावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांना बसू देणार नाही.  महापालिकेने फेरीवाला धोरण लागू केलं तर, मोठा संघर्ष होईल, अशी ठाम भूमिका सरदेसाई यांनी घेतली आहे.

फेरीवाले या ठिकाणी बसणार

  • भागोजी किर रोड
  • धारावी ६० फूट रोड
  • माहिम एम.एम.सी रोड
  • माहीम सुनावाला अग्यारी रोड
  • पंडित सातवडेकर मार्ग
  • व्ही.एस.मटकर मार्ग
  • व्ही.एस.मटकर मार्ग
  • शितलादेवी रोड
  • पद्माबाई ठक्कर रोड
  • एन.सी.केळकर रोड
  • सेनापती बापट मार्ग
  • बाबुराव परुळेकर मार्ग
  • गोखले रोड



हेही वाचा -

५ डे वीक वरून मंत्र्यांमध्येच मतभेद

राजकीय उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती जाहीर करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा