मनसेनं दिली दृष्टीहीन व्यक्तिला उमेदवारी

कामाठीपुरा - दृष्टीहीनांची क्रिकेट मॅच, अंधांच्या विविध स्पर्धा आपण पाहतो. मात्र आता राजकीय आखाड्यात एक दृष्टीहीन उमेदवार आपलं नशिब आजमावणार आहे. एेकून धक्का बसला ना? पण हे खरंय. कामाठीपुरातल्या प्रभाग क्रमांक 213 मधून दृष्टीहीन विनोद अरगिले हे महापालिका निवडणुकीत आपलं नशिब आजमावणार आहेत. मनसेकडून त्यांनी अर्ज भरला आहे.‘हम भी किसीसे कम नही’ असं म्हणत आता विनोद अरगिले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

Loading Comments