Advertisement

मनसेचे जनसंर्पक कार्यालय जनतेसाठी खुले..


मनसेचे जनसंर्पक कार्यालय जनतेसाठी खुले..
SHARES

मुंबादेवी- महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबादेवी विधानसभा प्रभाग क्रमांक २२० भुलेश्वर सुतार गल्ली येथे लक्ष्मीपूजन दिनाचे औचित्य साधून जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी राज्यस्तरीय कबडीपट्टू भाई पेडणेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. हे कार्यालय बुधवारपासून जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.या वेळी मुंबादेवी विधानसभेतील सर्व महिला, पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यालयाची स्थापना केशव मुळे विभाग अध्यक्ष यांनी केली. तसंच त्यांनी येत्या १५ दिवसात मुंबादेवी विधानसभेत आणखी दोन कार्यालयाची स्थापना करणार असल्याची माहिती ही त्यांनी दिली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा