Advertisement

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका मानला जात आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश
SHARES

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज ठाकरेंना आणखी एक मोठा झटका बसला आहे. मनसेच्या मुंबईतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधले.  

मुंबईतील घाटकोपरमधील मनसेचे माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर पक्ष प्रवेश करत शिवबंधन बांधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पराभव ज्याला जिव्हारी लागतो तो उद्याचा इतिहास घडवतो असं वक्तव्यही उद्धव ठाकरेंनी यावेळी केले.

निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत प्रवेश करत आहात. जे जिंकले त्यांच्याकडे जल्लोष नाही याचा अर्थ  त्यांना त्यांच्या विजयावर विश्वास नाही. तुम्ही सगळे एकत्र आलात योग्य वेळी आलात. जिंकल्यानंतर सर्व येतात हारल्यानंतर कोणी येत नाही. ज्याला पराभवाची खंत असते तो उद्याचा इतिहास घडवतो. आपल्याला तो इतिहास घडवायचा आहे असे उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले.

आपली हक्काची मुंबई ही ओरबाडून टाकली जात आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे का? शिवसेना हे नाव दुसऱ्या कोणाला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले. 



हेही वाचा

वर्सोव्यातील मनसे उमेदवाराला दोन्ही निवडणुकीत सारखीच मते

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा