कांदिवलीत मनसेचा निषेध मोर्चा

 Kandivali
कांदिवलीत मनसेचा निषेध मोर्चा
कांदिवलीत मनसेचा निषेध मोर्चा
कांदिवलीत मनसेचा निषेध मोर्चा
See all

कांदिवली - रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा निषेध करण्यासाठी आणि महापालिका अभियंते यांच्या कामचुकारपणाबद्दल गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघातील समतानगर पोलीस ठाणे येथे हा मोर्चा काढण्यात आला. या मतदारसंघाचे अध्यक्ष हेमंतकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात संबंधित अभियंत्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. या मोर्चाला मनसेचे सरचिटणीस संजय घाडी, उपाध्यक्ष नयन कदम, विभाग अध्यक्ष दिनेश साळवी, महिला विभाग अध्यक्षा आरती पवार यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Loading Comments