Advertisement

राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेचं 'ते' ट्विट व्हायरल

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर एक ट्विट केलंय.

राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेचं 'ते' ट्विट व्हायरल
SHARES

शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसेचे संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी देखील एक सूचक ट्विट केलं आहे. या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊत यांचं नाव नाही घेतलं. पण ट्विट पाहून तरी नाव न घेता संदीप देशपांडे यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे हे कळून येतंय.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर एक ट्विट केलंय. आपल्या ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ज्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप (BJP) सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या काळात २५ हजार रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.

तसंच किरीट सोमय्या यांचा पीएमसी बँक घोटाळ्यात हात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा **ची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की, तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली."



हेही वाचा

किरीट सोमय्या 'मुलुंडचा दलाल' - संजय राऊत

ते साडे तीन नेते कोण? हे उद्यापासून कळेल - संजय राऊत

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा