मनसेकडून स्वस्त आणि ताजी भाजी

 Mulund
मनसेकडून स्वस्त आणि ताजी भाजी
मनसेकडून स्वस्त आणि ताजी भाजी
मनसेकडून स्वस्त आणि ताजी भाजी
मनसेकडून स्वस्त आणि ताजी भाजी
See all

हनुमान चौक - मनसेकडून मुलुंडकरांसाठी स्वस्त दरात भाजी विक्री केली जातेय. मुलुंडमधल्या हनुमान चौक इथल्या मनसे कार्यालयाबाहेर हा उपक्रम राबवला जातोय. दर सोमवारी शेतामधून आणलेली भाजी स्वस्त दरात विकली जातेय. ताजी भाजी विकत घेण्यासाठी महिलावर्गही इथं गर्दी करतोय.

"नागरिकांना ताजी आणि स्वस्त भाजी मिळावी या उद्देशानं हा उपक्रम राबवला जातोय," अशी माहिती मनसेच्या नगरसेविका सुजाता पाठक यांनी दिली. तसंच मुलुंडकरांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

   भाजी नवीन दर ( किलो ) आधीचे दर( किलो )
 टॉमेटो 15 20
वांगी 10 20
मेथी जुडी 10 20
Loading Comments