Advertisement

फेरीवाला धोरणात ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच हवे - संदीप देशपांडे


फेरीवाला धोरणात ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच हवे - संदीप देशपांडे
SHARES

हॉकर्स पॉलिसी (फेरीवाला धोरण) अंमलात येईल तेव्हा ८० टक्के परवाने मराठी तरूणांनाच मिळाले पाहिजेत, अशी मागणी मनसे प्रवक्ते आणि सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारकडे केली आहे. एवढंच नाही, तर मनसे त्यासाठी स्वत: पुढाकार घेईल, अशी ठाम भूमिकाही देशपांडे यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या 'फेसबुक लाइव्ह'मध्ये बोलताना मांडली.


अनधिकृत फेरीवाल्यांवर ज्या पद्धतीने कारवाई व्हायला हवी होती, त्या पद्धतीने ती होत नव्हती म्हणून मनसेने आपल्या स्टाईलने त्यांच्यावर कारवाई केली. त्यामुळेच आज हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया देशपांडे यांनी दिली. यापुढे आम्ही लोकांमध्ये जनजागृती करून फेरीवाल्यांकडून काहीही विकत घेऊ नका, जेणेकरून तुम्हालाच त्रास होणार नाही, यासाठी जनजागृती करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


बघा संदीप देशपांडे यांची मुलाखत:




नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?

  • इतकं नालायक सरकार मी पाहिलं नाही
  • मनसेकडून जेवढी अपेक्षा करता तेवढी मतं द्या, मग निश्चित बदल घडेल
  • सत्ता कशी राबवायची हे मनसेला चांगले माहीत आहे. एकदा सत्ता देऊन तरी बघा!
  • ज्या कारणासाठी काही नगरसेवक सोडून गेले त्याचं जास्त दु:ख वाटतं
  • ते मूळचे शिवसैनिक होते, तर १२ वर्षे इथे काय करत होते
  • मी मूळचा मनसैनिक आहे
  • राजकीय इच्छाशक्ती असेल, तर हे लोंढे देखील थांबतील
  • नितेश राणे यांच्या भूमिकेबाबत मी त्यांचं फोनवर कौतुक केलं
  • दादरमधील जी नॉर्थमध्ये दिवसाचा ५ टन कचरा या आंदोलनामुळे कमी झाला
  • ज्यांना फेरीवाल्यांचा कळवळा वाटतो ते स्वत:च्या दारात फेरीवाल्यांना जागा देणार का?
  • जे फेरीवाल्यांना वाचवत आहेत त्यांनाच हप्त्याविषयी जास्त माहिती
  • मनसेचं स्वत:चं अस्तिव आहे. कुणा दुसऱ्या पक्षासाठी आम्ही आंदोलन करत नाही




हेही वाचा -

राज्याच्या विकासात मुख्यमंत्र्यांची भूमिका योग्यच - नितेश राणे


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा