SHARE

मुंबई - शाकाहार-मांसाहारावरून घर नाकारल्यास थेट पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा अजब सल्ला पालिकेने दिला आहे. याप्रकरणी गुरुवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत बहुतांश नगरसेवकांनी संताप व्यक्त करत विरोध केला. त्यामुळे यासंबंधीचा प्रस्ताव परत पाठवण्यात आला.

मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी विकसकांविरोधात कारवाईसंबंधीच्या ठरावाची सूचना मांडली होती. यावर अभिप्राय देताना पालिकेने असा अजब सल्ला दिला आहे. 'हा विषय पालिकेच्या कार्यकक्षेत येत नसून याचा संबंध कायदा आणि सुव्यवस्थेशी आहे', असे स्पष्टीकरणही यामागे दिले आहेत. मनसे, काॅंग्रेस, शिवसेनेसह सर्वच पक्षातील नगरसेवकांनी पालिकेच्या या अजब सल्ल्याबाबत आश्चर्य व्यक्त करत विकासकांवर कारवाई झालीच पाहिजे ही मागणी उचलून धरली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या