'...नाही तर मनसे स्टाईलनं अद्दल घडवू'


SHARE

मुंबई - खड्ड्याच्या मुद्द्यावरून मनसेनं पुन्हा पालिकेला टार्गेट केलंय. दिवाळीपर्यंत मुंबईचे सर्व रस्ते खड्डेमुक्त झाले नाहीत, तर मनसे स्टाईलनं दणका देऊ, असा इशारा मनसेच्या नगसेवकांनी दिलाय. दिवाळीपर्यंत खड्डे बुजवले नाही तर पुन्हा खड्ड्यात उभं करू, असा दमच संदीप देशपांडे यांनी दिलाय. पालिका अधिकाऱ्यांच्या क्रिकेटप्रकरणी मंगळवारी मनसे नगरसेवकांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यावेळी मनसेनं आयुक्तांना हा इशारा दिला.

सोमवारपर्यंत खड्डे बुजवणार असं आश्वासन पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिलं होतं. पण मंगळवारी सकाळीच पालिकेची पोलखोल झाली. अजूनही काही रस्त्यांवरचे खड्डे पालिकेनं बुजवले नसल्याचा दावा मनसेनं केलाय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या