SHARE

सिद्धार्थनगर - बोरीवली पूर्व सिद्धार्थनगर येथे तयार करण्यात आलेल्या श्रीकांत ठाकरे उद्यानाचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवीण दरेकर यांच्या मनसेतून जाण्याने पक्षाला मोठं खिंडार पडलंय. त्यामुळे राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी मनसेची तटबंदी मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. प्रभाग क्र. 14 चे नगरसेवक चेतन कदम यांच्या प्रयत्नातून या उद्यानाचं नूतनीकरण करण्यात आलंय. त्यानंतर राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवादही साधला. स्थानिकांनी उद्यानाचा वापर चांगल्या कामासाठी करावा, असं आवाहनही या वेळी करण्यात आलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या