Pali Hill
  ...ये सिनेमा रिलीज होना है मुश्किल

  ...ये सिनेमा रिलीज होना है मुश्किल

  Share
  Now
  मुंबई  -  

  मुंबई - मल्टिप्लेक्‍स चालकांनी पाक कलाकारांचं चित्रपट दाखवल्यास कामबंद आंदोलन पुकारेल असा इशारा मनसेच्या कामगार संघटनेनं दिला आहे. त्यामुळं करण जोहरच्या विनंतीला मनसेनं केराची टोपली दाखवल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘आधी चले जाव’ची हाक देऊन तोडफोडीचा इशारा दिलेल्या मनसेनं आता असहकार पुकारला आहे. पीव्हीआर, सिनेपोलिस, कार्निव्हलसह इतर सिनेमा थिएटर्समध्ये 70 टक्के कर्मचारी मनसे कामगार संघटनेचे आहेत. मल्टिप्लेक्‍समधील तंत्रज्ञ, सुरक्षारक्षक आणि चतुर्थश्रेणी कर्मचारीही मनसेशी बांधील आहेत. त्यामुळं मनसे कर्मचारी संघटनेनं संप पुकारला तर थिएटर्स चालणे मुश्‍कील होईल.

  ‘ऐ दिल है मुश्‍किल’ हा सिनेमा शूट केला तेव्हाची परिस्थिती वेगळी होती आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळं हा सिनेमा प्रदर्शित होऊ द्यावा, यापुढं पाकिस्तानी कलाकारांना घेऊन सिनेमा करणार नाही, अशी विनंती कारण जोहर नं केली मात्र परिस्थिती पाहता 'ये सिनेमा रिलीज होना है मुश्किल' असचं म्हणावं लागेल.

  Share
  Now
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.