Advertisement

स्टाईल फेम अभिनेत्याला मनसेचा इशारा, "कार्यालयात आला नाही तर..."

मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यात मनसे मध्यस्थी करेल, असं मनसेकडून सांगण्यात आलंय.

स्टाईल फेम अभिनेत्याला मनसेचा इशारा, "कार्यालयात आला नाही तर..."
SHARES

मिस्टर इंडिया बॉडी बिल्डर मनोज पाटील यानं आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये, स्टाईल फेम अभिनेता साहिल खान (Sahil Khan) यांच्यावर आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.

अभिनेता साहिल खान मला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज यानं यात केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उडी घेतली आहे.

“साहिल खान जर २० सप्टेंबरला मनसे कार्यालयात आला नाही तर त्याला त्या पद्धतीचा इशारा देण्यात येईल”, असा इशारा मनसेनं दिला आहे. दरम्यान, मनोज पाटील सध्या कूपर रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यात मनसे मध्यस्थी करेल, असं देखील मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं आहे.

“आम्ही साहिल खानला बोलावून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. मनोज पाटील यांच्या कुटुंबियांशी बोलून आम्ही विषय समजून घेतलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी साहिल खानला बोलावलेलं आहे. यावेळी, मनोज पाटील आणि साहिल खान यांच्यातील समज-गैरसमज दूर करू”, असं संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

मनोज पाटीलनं बुधवारी (१५ सप्टेंबर) रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप देखील मनोज पाटीलनं केला आहे. त्यानं त्याच्या सोशल मीडियावरही व्हिडीओ शेअर करत हे आरोप केले होते. त्रास आणि बदनामीमुळेच आपण आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं मनोज पाटीलनं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.



हेही वाचा

असल्या फडतूस नोटीस आणि धमक्यांना घाबरत नाही : किरीट सोमय्या

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा