मनसेत जोरदार इनकमिंग


  • मनसेत जोरदार इनकमिंग
SHARE

दादर - येथील माजी नगरसेवक नारायण पवार आपल्या कंची कोरवे कैकाडी समाजातील सुमारे दोनशे महिला पुरुष कार्यकर्त्यांसह आज कृष्णकुंज येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला . माजी नगरसेवक असलेल्या नारायण पवार हे एल प्रभाग समितीचे अध्यक्षही होते. तसेच रिपब्लिकनसेनेच्या वाकोला तालुका अध्यक्षा सह वाकोला येथील कार्यकर्त्यांनीही मनसेत प्रवेश केला. मनसेतून अनेक कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात असताना आजच्या या कार्यकर्त्याच्या प्रवेशामुळे मनसे पक्षासाठी येणाऱ्या पालिका निवडणुकीसाठी ही नवी संजीवनी मिळाल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे .

संबंधित विषय
ताज्या बातम्या