मनसे आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये तु तु मैं मैं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न उचलत राडा घातला. वरळी, प्रभादेवी आणि परळ परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगर पालिकेच्या जी साऊथ विभागातील अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचं म्हणत शनिवारी दुपारी मनसेच्या संतोष धुरी यानी थेट पालिकेच्या जी साऊथ कार्यालयावर धाव घेतली.

SHARE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न उचलत राडा घातला. वरळी, प्रभादेवी आणि परळ परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मुंबई महानगर पालिकेच्या जी साऊथ विभागातील अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचं म्हणत शनिवारी दुपारी मनसेच्या संतोष धुरी यानी थेट पालिकेच्या जी साऊथ कार्यालयावर धाव घेतली.  यावेळी पालिकेच्या १५ ते २० अधिकाऱ्यांनी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यानंतर काही वेळातच मनसेचे सरचिटणी संदीप देशपांडे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह इथं धाव घेतली आणि मग मनसे-पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत हे प्रकरण शांत केलं. मात्र मनसेचे कार्यक्रते आक्रमक झाले असून अधिकाऱ्यांविरोधात लवकरच पोलीस तक्रार दाखल करणार असल्याची माहिती संतोष धुरी यांनी 'मुंबई लाइव्ह' ला दिली आहे.अधिकारी अंगावर धावून आले?

वरळी, प्रभादेवी आणि परळ भागात अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाले बसतात. या अनधिकृत फेरिवाल्यांचा त्रास नागरिकांना होतो. तशा अनेक तक्रारी आपल्याकडे आल्यानं त्याविरोधात पालिकेकडे महिन्याभरापूर्वी तक्रार केली. पालिकेकडून काहीही कारवाई होत नव्हती, कारवाईसाठी पाठपुरावा सुरू होता. शेवटी स्वत जाऊन पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करत कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी आपण जी साऊथ कार्यालयात गेल्याची माहिती धुरी यांनी दिली आहे. मात्र तिथं गेल्यानंतर संबंधित अधिकारी पळून सहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्या दालनात धाव घेतली. त्यानंतर काही मिनिटांनी त्या अधिकाऱ्यांसह १५ ते २० अधिकारी आपल्या अंगावर धावून अाल्याचा आरोप धुरी यांनी केला आहे.


मनेस स्टाईल धडा शिकवू

मनसे कार्यकर्त्यांना याची माहिती मिळाल्याबरोबर देशपांडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जी साऊथ कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी देशपांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी इथं चांगलाच राडा घातला. त्यानंतर पालिका अधिकारी आणि मनसेमध्ये तु तु मैं मैं झाली. मात्र पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत प्रकरण शांत केलं. दरम्यान अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई झाली नाही तर पालिका अधिकाऱ्यांना मनसे स्टाईल धडा शिकवू असा पुनरूच्चार मनसेनं केला आहे. त्यामुळे पुन्हा अनधिकृत फेरीवाल्यांचा विषय उचलला जाण्याची शक्यता आहे.हेही वाचा -

मुंबई-दिल्ली राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी दाखवला हिरवा कंदील

फेसबुक फ्रेंडचं गिफ्ट शिक्षिकेला पडलं महागातसंबंधित विषय
ताज्या बातम्या