मुलुंडमध्ये व्यायाम शाळेचे भूमिपूजन

 Dalmia Estate
मुलुंडमध्ये व्यायाम शाळेचे भूमिपूजन
मुलुंडमध्ये व्यायाम शाळेचे भूमिपूजन
See all

मुलुंड - निवडणुकीच्या तोंडावर मुलुंडमधील नवघररोड येथील नागदेवता मंदिराशेजारी लवकरच व्यायामशाळा बांधली जाणार आहे. मनसेच्या नगरसेविका सुजाता पाठक यांच्या निधीतून याचं बांधकाम होणार आहे. गुरुवारी सुजाता पाठक यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. या ठिकाणी एक पडके सार्वजनिक शौचालय आहे. ते अनेक वर्षापासून वापरात नसल्यानं त्या जागेचा उपयोग व्यायाम शाळेसाठी होणार आहे. या वेळी मुलुंडमधील मनसेचे पदाधिकारीही उपस्थित होते. 'जागा पडून राहण्यापेक्षा त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी केला पाहिजे, असं मत नगरसेविका सुजाता पाठक यांनी व्यक्त केले. मुलुंडमध्ये अनेक व्यायामशाळा आहेत परंतु मुलुंडकरांसाठी ती संख्या अपुरी आहे. तेव्हा या व्यायामशाळेचे बांधकाम लवकर पूर्ण होणं अपेक्षित आहे.

Loading Comments