SHARE

मुंबई - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी आणि लाचखोर असल्याची टीका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांनी केली आहे. भ्रष्टाचार मुक्त भारत हे त्यांचे फक्त ढोंग आहे. तसेच नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरात येथे मेहसाना येथील सभेत पुरावे सादर करून हे सिद्ध केलं असल्याचेही निरूपम म्हणालेत. नरेंद्र मोदी यांनी सहाराकडून 2014 मध्ये 9 वेळा पैसे घेतलेले आहेत याचे पुरावे असल्याची प्रतिक्रीयाही त्यांनी यावेळी दिली. तसेच आयकर विभागाकडे ऑन रेकॉर्ड माहिती आहे की सहाराने कधी, कोणत्या तारखेला आणि किती पैसे मोदी यांना दिले आहेत. हा संपूर्ण रेकॉर्ड राहुल गांधी यांच्याकडे असल्याचंही सांगत मोदींवर शरसंधान साधलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या