Advertisement

मनसे नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा


मनसे नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा
SHARES

मुंबई - एका महिलेला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी मनसे नगरसेवकाविरोधात दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुधीर जाधव असं या नगरसेवकाचे नाव असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

मनसेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादरमधून मनसेचेे नगरसेवक सुधीर जाधव यांची पत्नी स्नेहल जाधव यांना वॉर्ड 192 मधून मनसेने उमेदवारी दिली आहे. नगरसेवक सुधीर जाधव यांनी पत्नीच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून ते घरोघरी जाऊन प्रचार करत होते. प्रचारादरम्यान एका महिलेला आपल्या पत्नीला मत देण्याचा आग्रह करत त्यांनी या महिलेचा मोबाइल क्रमांक घेतला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत व्हाॅट्सअॅपवरून जाधव यांनी रात्रभर त्या महिलेला आक्षेपार्ह मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. तसेच व्हिडिओ काॅल केल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे. याशिवाय आपला पूर्ण फोटो पाठवण्याचा आग्रह देखील जाधव यांनी केल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे.

त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करू नये म्हणून धमकावण्यात आल्याचंही महिलेने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यापकरणी दादर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा