घाटकोपरमध्ये आई-मुलगा निवडणूक रिंगणात

  Ghatkopar
  घाटकोपरमध्ये आई-मुलगा निवडणूक रिंगणात
  मुंबई  -  

  घाटकोपर - महापालिका निवडणुकीत अनेक कुटुंबं रिंगणात पाहायला मिळत आहेत. या निवडणुकीत घाटकोपर पश्चिम येथून आई आणि मुलाची जोडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. त्यापैकीच एक म्हणजे प्रभाग 124 मधून ज्योती हारुन खान तर दुसरीकडे प्रभाग 129 मधून रोषन हारुन खान निवडणूक लढवत आहेत.

  "मला निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्या बद्दल मी खूप खूश आहे. लोकांना त्यांचा विकास करणारा एक नवीन उमेदवार हवा आहे. मी प्रभाग 129 मधून निवडणूक लढवत असून माझ्याकडून लोकांना असलेल्या अपेक्षा मी पूर्ण करणार आहे. माझी आई माझ्या वडिलासोबत गेली अनेक वर्षापासून राजकारणात सक्रीय होती. पण, आता पहिल्यांदा निवडणूक लढवणार असल्याचा मला खूप आनंद वाटत आहे," असे राष्ट्रवादीचे उमेदवार रोषन हारुन खान यांनी सांगतले. तर "पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे मी खूप आनंदी आहे", असे प्रभाग 124 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती हारुन खान यांनी सांगितले.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.