Advertisement

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, नड्डा यांचा दावा

नड्डा यांनी आपल्या दोन दिवसीय राज्य दौऱ्यात मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबत बैठका घेतल्या..

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर होणार, नड्डा यांचा दावा
SHARES

मुंबई महानगरपालिकेत भाजपचाच महापौर बसणार, असा दावा मुंबई दौऱ्यावर आलेल्या भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला आहे. त्यांनी यावेळी महापालिका निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी चर्चा केली.

भाजपने महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपचे  अध्यक्ष जे.पी.नड्डा हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे.

मुंबई महापालिकेत ठाकरे गटाची सत्ता आहे. या सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजप आणि एकनाथ शिंदे करण्यासाठी तयारी करत आहे.

बैठकीत त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने तयारीला सज्ज व्हा, असा संदेश दिला आहे. पुढील महापौर हा भाजपचा असला पाहिजे, असे स्पष्ट बजावले आहे. तसेच याबाबत त्यांनी स्पष्ट सांगितले की, पुढील महापौर हा भाजपचाच असेल.

दरम्यान, भाजप प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुण्यात होत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. निवडणुकीची रणनीती या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. जे. पी. नड्डा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विविध आघाडीचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.हेही वाचा

मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटकं ठेवण्याची कल्पना फडणवीसांचीच - नाना पटोले

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा