Advertisement

bmc election 2022: राष्ट्रवादी कॉंग्रेसही स्वबळावर लढणार मुंबई महापालिका निवडणूक

येत्या आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या तयारीला सुरूवात केली आहे.

bmc election 2022: राष्ट्रवादी कॉंग्रेसही स्वबळावर लढणार मुंबई महापालिका निवडणूक
SHARES

येत्या आगामी काळात मुंबई महापालिका निवडणूक होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या तयारीला सुरूवात केली आहे. पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना संबोधिक करण्यासह सुरूवात केली आहे. अशातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तयारीची माहिती समोर येत आहे. त्यानुसार, यंदाच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरच लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढणार असली तरी मर्यादित जागी उमेदवार उभे करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनिती ठरविण्यासाठी पक्षाच्या मुंबई कार्यालयात नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई जिल्हाध्यक्ष, प्रभारी आणि नगरसेवकांची विशेष बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

वॉर्डांची फेररचना झाल्यानंतर विद्यमान नगरसेवकांच्या वॉर्डांची स्थिती काय आहे, त्याचबरोबर कोणत्या जागांवर आम्ही स्वबळावर लढू शकतो याचा अंदाज घेण्यात आला.

१४ फेब्रुवारीला विधानसभानिहाय बैठका घेऊन त्यामध्ये अंदाज घेतला जाईल व इतर पक्षांसोबत बोलणी करून वरिष्ठ नेते अंतिम निर्णय घेतील असे मलिक यांनी सांगितले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा