Advertisement

महिला सुरक्षेसाठी मुंबईला २२५ कोटी वितरित


महिला सुरक्षेसाठी मुंबईला २२५ कोटी वितरित
SHARES

देशातल्या ८ प्रमुख शहरांमधील महिलांची सुरक्षा व्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाचं पाऊल उचललं असून त्यात मुंबईचाही समावेश आहे. निर्भया फंड अंतर्गत मुंबईला २२५ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आल्याची माहिती केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरा वेळी दिली.


एकूण किती निधी?

केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत २ हजार ९१९ कोटी ५५ लाख रूपयांचा निधी या शहरांना वितरीत करण्यात आला. तर मुंबईसाठी २२५ कोटींचा निधी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय महिला व बाल कल्याण राज्यमंत्री डॉ. विरेंद्र कुमार यांनी दिली.


निधी वापर कुठे?

मुंबई शहरातील गुन्ह्यांची संख्या जास्त असलेल्या भागात जीआयएस मॅपींग सेवा उभारण्यासाठी, सी.सी.टी.व्ही कॅमरे लावण्यासाठी, गुन्हे तपास अधिकारी व विधी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे.



हेही वाचा-

आंदोलकांना सरकारची भूमिका समजावून सांगा, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना निर्देश

मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं आरक्षण देणार- मुख्यमंत्री



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा