महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा मराठी बाणा

  BMC
  महापौर विश्वनाथ महाडेश्वरांचा मराठी बाणा
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या मराठी भाषेचा अट्टहास धरला आहे. बोलेन तर मराठीतूनच ! इतर कोणत्याही भाषेतून बोलणार नाही' असा पणच महापौरांनी केला आहे. इतर भाषिक वृत्त वाहिन्यांच्या प्रतिनिधींनाही त्यांनी मराठीतूनच बोलणार, असे सांगत हिंदी आणि इंग्लिश भाषेतून बोलण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे मराठी बाणा असलेल्या या महापौरांमुळे महापालिकेत मराठी भाषेला चांगले दिवस येणार असल्याचे दिसून येत आहे.

  मुंबई महापालिकेचे कामकाज हे 100 टक्के मराठी भाषेतूनच करण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. तशा प्रकारचे परिपत्रकही सामान्य प्रशासनाने जारी केले आहे. परंतु या परिपत्राची अमलबजावणी महालिकेत होत नाही. शिवसेना पक्ष हा कायम मराठी भाषेचा पुरस्कर्ता राहिला आहे. परंतु शिवसेनेचे अनेक महापौर झाले तरी त्यांना मराठी भाषेकरिता कधी पुढाकार घेता आलेला नाही. परंतु महापौरपदी विराजमान झाल्यावर प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांनी मराठी भाषेचाच अट्टाहहास धरला आहे. सर्व प्रथम त्यांनीही इतर भाषिक माध्यमांशी बोलतांना मराठी भाषेतूनच बोलण्याचा निर्धार केला आहे. कोणत्याही इतर भाषिक वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी मराठीतूनच बोलले जाईल, असे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आपण मला हिंदीतून आणि इंग्रजी भाषेतून प्रश्न विचरावे, परंतु त्याची उत्तरे मराठी भाषेतूनच देऊ, असे त्यांनी सांगितले. मराठी ही आपली मातृभाषा असून याच भाषेतून आपण बोलले पाहिजे, हे माझे मत असून महापौर म्हणून मी याच भाषेतून बोलणार आहे. कामकाजातही मराठी भाषेचीच सक्ती केली जाणार असल्याचेही महापौरांनी स्पष्ट केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.