'रईस' मुंबई लाइव्हमध्ये...

  मुंबई  -  

  दादर - समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबु आसीम आझमी यांनी महिलांच्या तोकड्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यावर सपाचे गटनेता रईस शेख यांनी असहमती दर्शवली आहे. महिलांवर अत्याचार तोकड्या कपड्यांमुळे नाही तर काही पुरुषांच्या विकृत मानसिकतेमुळे होत असल्याचं मत त्यांनी मांडलं. मात्र हे करत असताना आपल्या बॉसच्या भूमिकेचे समर्थन करायलाही ते विसरले नाहीत.

  मुंबई उपनगरातील जुना वॉर्ड शिवाजी नगरऐवजी दक्षिण मुंबईतील मदनपुरामधून ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस हा अवसानघातकी पक्ष आहे असं म्हणणारे रईस मुंबई महानगर पालिका निवडणुकीत काँग्रेसबरोबरच आघाडीसाठी अनुकुल आहेत.

  पहिल्यांदाच मुंबई महानगर पालिका निवडणूक लढवणाऱ्या एआयएमआयएम पक्षाचं कोणतंही आव्हान नसल्याचा छातीठोक दावा करत या पक्षाच्या मुंबईतल्या एकमेव आमदाराला आपण खिजगणतीत धरत नसल्याचं रईस यांनी खुबीनं भासवलं. सोमवारी रईस शेख यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या 'उंगली उठाओ' कार्याक्रमात सहभाग घेत सर्व प्रश्नांना उत्तरं दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.