राजकीय दिग्गजांनीही केलं मतदान

Mumbai  -  

मुंबई - महापालिकेसाठी मतदानाला सुरूवात झाली असून अनेक दिग्गजांनीही मतदानाचा अधिकार बजावला. मंगळवारी सकाळी मतदानाला सुरूवात होताच राहुल शेवाळे यांनी मानखुर्दमधून मतदान केले. तर विनोद तावडेंनी साठ्ये कॉलेजमधून मतदानाचा हक्क बजावला. किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांनी कुटुंबासमवेत मुलुंड प्रभाग 105 मध्ये मतदान केले. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवतीने पहिल्यांदाच आजोबा शरद पवार यांच्यासह मुंबईत मतदानाचा हक्क बजावला. रेवती आणि शरद पवार यांनी वॉर्ड क्रमांक 214 मध्ये मतदान केलं. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारच नाही. त्यामुळे त्यांनी कोणाला मत दिले यावर चर्चा रंगल्या आहेत. आशिष शेलार, मनोहर जोशी, राज ठाकरे, मधू चव्हाण अशा अनेक राजकीय दिग्गजांनी मतदान केले.

Loading Comments