Advertisement

'या' भाजपच्या आमदारानं घेतली राज ठाकरेंची भेट

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली

'या' भाजपच्या आमदारानं घेतली राज ठाकरेंची भेट
SHARES

भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. प्रसाद लाड यांनी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी भेट घेतली. मात्र, या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली, हे गुलदस्त्यात असल्यामुळं राजकीय चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. दरम्यान, प्रसाद लाड आणि राज ठाकरे यांच्या भेटीचं एका वृत्तवाहिनीनं दिलं आहे.

भाजपवर हल्लाबोल

प्रसाद लाड हे विधान परिषदेचे आमदार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. राज ठाकरे हे मागील पाच वर्षांपासून भाजपवर सातत्यानं हल्लाबोल करत आहेत. लोकसभा निवडणूकीदरम्यान राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्याविरोधात प्रचार केला होता. अस असतानाही भाजपच्या आमदारानं राज ठाकरेंची भेट घेतली. त्यामुळं आता या भेटीला महत्त्व प्राप्त होत आहे.

निवडणूक पुढे ढकला

मुंबईत ९ ऑगस्टला झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. तसंच पूरपरिस्थितीवरूनही भाजप सरकारवर टीका केली. पूरस्थिती पाहता विधानसभा निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी राज यांनी केली होती. तसेच ईव्हीएमऐवजी बॅलेटपेपरनं निवडणुका घ्याव्यात अशीही मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.



हेही वाचा -

पूर आणि पावसामुळं भाजीपाल्याचे दर तिप्पट

रिक्षावर झाड कोसळल्यानं चालकाचा मृत्यू



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा