रिक्षावर झाड कोसळल्यानं चालकाचा मृत्यू


SHARE

मुलंड येथे रिक्षावर झाड कोसळून एकाचा मृत्यू आणि एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अशोक शिंगरे (४५) असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तसंच, राजेश भंडारी (२९) हे जखमी असून त्यांच्यावर एम.टीअग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी रात्री ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

मोठे झाड कोसळलं

मुलुंड येथील एन.एस. मार्गावरून रिक्षा जात असताना, इथं असलेलं मोठे झाड रिक्षावर कोसळलं. त्यावेळी या रिक्षामध्ये असलेले चालक शिंगरे आणि प्रवासी राजेश भंडारी गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना घडताच स्थानिकांनी या दोघांना तातडीनं जवळच्या पालिकेच्या एम. टी. अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान शिंगरे यांचा मृत्यू झाला. तसंच, अशोक शिंगरे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. 

धोकादायक फांद्या

कोसळलेल्या झाडाच्या धोकादायक फांद्या या पावसाळ्यापूर्वीच छाटण्यात आल्या होत्या. परंतु, या झाडाची मुळं सडल्यानं कमकुवत झालं होतं, त्यामुळं ते झाड कोसळल्याचं सांगितलं जात आहे.हेही वाचा -

पुरामळं बेघर झालेल्या कुटुंबियांच्या मदतीला धावली गणेश मंडळंसंबंधित विषय
ताज्या बातम्या