पूर आणि पावसामुळं भाजीपाल्याचे दर तिप्पट

राज्यातील काही भागांत निर्माण पूरस्थितीमुळं आणि मुसळधार पावसामुळं भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत.

SHARE

राज्यातील काही भागांत निर्माण पूरस्थितीमुळं आणि मुसळधार पावसामुळं भाजीपाल्याची आवक घटल्याने भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. ग्राहकांना भाजांच्या नियमित दरांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, अस असलं तरी, घाऊक बाजारातील दरांपेक्षा दुप्पट, तिप्पट किंमत आकारून किरकोळ बाजारातील विक्रेते ग्राहकांची लूट करत असल्याची माहिती समोर येत आहे. भाज्यांचे घाऊक दर, वाहतूक खर्च, सामान चढवण्याचा व उतरवण्याचा खर्च आदी सर्वांचा विचार केला असता किरकोळ विक्रेत्यांकडून भाज्यांचे दर खूपच जास्त लावले जात आहेत. त्याचा फटका सामान्य ग्राहकाला बसत आहे.

वाहतूक खर्च

मुंबईसह उपनगरात विकली जाणारी भाजी नवी मुंबईच्या वाशी येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेतून आणण्यात येते. वाशी ते मुंबई आणि उपनगर यांसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांपर्यंतच्या प्रवासाचा वाहतूक खर्च जास्त नसतो. २ हजार किलो भाजी टेम्पोनं आणण्याचं भाडं २ हजार रुपये असतं. पाऊस असल्यास हे भाडं २२०० रुपये होतं. तसंच, सामान चढविण्याचा खर्च प्रतिकिलो ५ रुपये असतो.

भाजीचा घाऊक दर

वाशीच्या घाऊक बाजारात सध्या भाजीचा सरासरी घाऊक दर ५० ते ५५ रुपये किलो आहे. वाहतूक आणि सामान चढविणं आणि उतरविण्याचा खर्च २७०० रुपये आणि अधिभार ११०० रुपये आहे. प्रतिकिलोनुसार हा दर ५६ ते ५७ रुपये होतो. परंतु, किरकोळ बाजारातील भाजीचा सरासरी विक्री दर तब्बल १२० रुपये प्रतिकिलो म्हणजेचं तिप्पटी झाल्याचं समजतं.हेही वाचा -

रिक्षावर झाड कोसळल्यानं चालकाचा मृत्यू

इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास कॉलेजांची मान्यता रद्दसंबंधित विषय