इंजिनीयरिंगच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास कॉलेजांची मान्यता रद्द

इंजिनियरिंग कॉलेजांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, आता एकाद्या विद्यार्थ्यानं तक्रार केल्यास त्याची दखल न घेतल्यास कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येणार आहे.

SHARE

इंजिनियरिंग कॉलेजांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, आता एकाद्या विद्यार्थ्यानं तक्रार केल्यास त्याची दखल न घेतल्यास कॉलेजची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. इंजिनियरिंग कॉलेजमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना जातीभेद, रॅगिंग समस्यांचा सामना करावा लागतो. तसंच, अशा प्रकारच्या घटना घडल्यावर विद्यार्थी तक्रारीही करतात. परंतु, या तक्रारींची दखल कॉलेजकडून घेतली जात नसून, अगदी थोड्याच तक्रारींची दखल घेतली जाते. त्यामुळं आता इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यानं तक्रार दाखल केल्यावर त्या तक्रारीची तातडीनं दखल न घेतल्यास संबंधित कॉलेजची मान्यताच रद्द करण्यात येईल, असा इशारा अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं (एआयसीटीई) दिला आहे.

तक्रार निवारण समिती

इंजिनियरिंगच्या प्रत्येक कॉलेजमध्ये तक्रार निवारण समिती असून, विद्यार्थी आपल्या तक्रारी या समितकडं दाखल करतात. त्यानंतर, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची शहानिशा केल्यावर या समितीकडून कारवाईची शिफारस करण्यात येते. मात्र, कॉलोज प्रशासन त्यावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या तक्रारी एआयसीटीई आल्या होत्या. त्यामुळं या विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणींची दखल घेत एआयसीटीईनं उपाय म्हणून कायद्याचा नवा मसुदा तयार केला आहे. या मसुद्यावर विद्यार्थी, पालक आणि संबंधितांचे मतं एआयसीटीईनं २० ऑगस्टपर्यंत मागवली आहेत.

अशी होणार कारवाई

विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास संबंधित इंजिनियरिंग कॉलेजचे अनुदान बंद करण्यात येणार आहे. मान्य झालेल्या अनुदानाला स्थगिती दिली जाणार आहे. एआयसीटीईची मान्यता रद्द करण्यात येईल. संबंधित विद्यापीठाची संलग्नता रद्द करण्याची शिफारस केली जाईल. एआयसीटीईच्या विशेष कार्यक्रमांतर्गत देण्यात येणार निधी रद्द केला जाईल. तसंच, संबंधित कॉलेज विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल न घेत असल्याचं माध्यमांमध्ये जाहीर नोटीस देण्यात येईल.हेही वाचा -

रिक्षावर झाड कोसळल्यानं चालकाचा मृत्यूसंबंधित विषय
ताज्या बातम्या