मुंबईत ३१ जानेवारीला मराठा समाजाचा एल्गार

 Pali Hill
मुंबईत ३१ जानेवारीला मराठा समाजाचा एल्गार

मुंबई - मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात काढण्यात आलेल्या मराठा मूक मोर्चांना विराट प्रतिसाद मिळाला होता. आता या मोर्चाचं वादळ मुंबईत धडकणार आहे. मुंबईत ३१ जानेवारीला मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. मरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा हा मोर्चा निघेल. मराठा मोर्चाच्या आयोजकांनी औरंगाबादमध्ये बुधवारी ही माहिती दिली. 31 जानेवारीला दुपारी 1 वाजता नियोजित ठिकाणापासून मराठा समाजाचा मोर्चा निघणार आहे. यापूर्वीही राज्यभरात मराठा समाजाच्या वतीनं मोर्चे काढण्यात आले होते.

समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सरकारी पातळीवर संबंधित अधिकाऱ्यांनाही त्या-त्या ठिकाणी निवेदने देण्यात आली आहेत. आता थेट राज्यपालांनाच विविध मागण्यांचं निवेदन देण्यात येईल आणि सरकारचा निषेधही करण्यात येईल. अशी माहिती मराठा मोर्चाच्या आयोजकांनी दिली.

Loading Comments