आम्ही मतदान करायचं तरी कसं?

दादर - मुंबईत मंगळवारी 55 टक्के इतकं विक्रमी मतदान झालं. मात्र तरीही 12 लाख मतदार मतदानापासून वंचित राहिल्याचं समोर आलं. केवळ मतदार यादीत झालेल्या घोळामुळे 12 लाख मुंबईकरांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. इच्छा असूनही अनेकांना मतदानच करता आलं नाही. त्यामुळे मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा घोळ झाला त्याला निवडणूक आयोग आणि सरकार जबाबदार असल्याची प्रतिक्रिया काही मुंबईकरांनी दिली. तर काहींनी यासाठी मतदारच जबाबदार असल्याचं सांगितलं.

Loading Comments