मुंबईत 'नोटा'

 Mumbai
मुंबईत 'नोटा'

मुंबई - मुंबई महानगर पालिका निवडणुकीचे निकाल 23 फेब्रुवारीला जाहीर झाले. यंदा शिवसेना आणि भाजापा या दोन पक्षांना मुंबईकरांनी पसंती दिल्याचं पहायला मिळालं. शिवसेनेचे 84 तर भाजपाचे 82 उमेदवार निवडून आलेत. मात्र हे सगळं असलं तरी यंदा 'नोटा'चा पर्यायही अनेकांनी वापरल्याचं समोर आलंय. तब्बल 73 हजार मतदारांनी थेट नोटाचा वापर केला. विशेष म्हणजे नोटाचे सर्वाधिक प्रमाण हे अंधेरीमध्ये पहायला मिळाले. या विभागात 6 हजार 141 जणांनी नोटाचा पर्याय वापरला आहे. तर मशीद बंदर येथे सर्वात कमी म्हणजे 972 जणांनी 'नोटा' वापरलाय.बोरिवली-गोराई

Loading Comments