Advertisement

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बच्चू कडू यांनी स्वत:च सोशल मीडियातून याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना महाविकास आघाडी सरकारमधील आणखी एक मंत्री बच्चू कडू यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बच्चू कडू यांनी स्वत:च सोशल मीडियातून याबाबतची माहिती दिली आहे. (MVA government minister of state for water resources bacchu kadu tests COVID 19 positive)

राज्याचे जलसंपदा आणि शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आला. याबाबत कडू यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. 'माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी', असं आवाहन ट्विटरद्वारे कडू यांनी सर्वांना केलं आहे.

बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजताच राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्वत:ची काळजी घ्या, असा सल्ला त्यांना दिला.

बच्चू कडू यांच्याआधी शुक्रवारी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांनी देखील संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी म्हणून चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं होते. राऊत आणि मुश्रीफ या दोघांचीही तब्येत ठिक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाने गाठलं असून त्यापैकी बहुतेक मंत्री कोरोनावर यशस्वी मात करून पुन्हा एकदा कामाला देखील लागले आहेत. या मंत्र्यांमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, क्रीडा व युवा कल्याण मंत्री सुनील केदार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा समावेश आहे. त्यात आता बच्चू कडू यांची देखील भर पडली आहे. तर ३० हून अधिक विधानसभा/विधान परिषद समस्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement