Advertisement

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यापाठोपाठ आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण
SHARES

ऊर्जामंत्री  नितीन राऊत यांच्यापाठोपाठ आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मुश्रीफ यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुश्रीफ यांनी स्वतः ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.  

मुश्रीफ म्हणाले की, माझ्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी स्वतःची कोरोना टेस्ट करुन घ्यावी. लवकरच मी कोरोनावर मात करुन आपल्या सेवत दाखल होईन. सध्या माझी तब्येत उत्तम आहे.   लॉकडाऊनमध्ये लोकप्रतिनिधी विविध कामांनिमित्त आपापल्या मतदारसंघामध्ये फिरत आहेत. बैठका व अन्य जबाबदाऱ्यांमुळं त्यांचा अधिकारी, पोलीस व कार्यकर्त्यांशी सातत्यानं संपर्क येत आहे. त्यातून त्यांना करोनाची लागण झाली आहे. 

उर्जामंत्री नितीन राऊत यांना आजच कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. राज्यातील अनेक मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, अस्लम शेख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे. हेही वाचा  -

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कोरोनाची लागण

तर, खासदारकीचा राजीनामा देईन, उदयनराजेंचा इशाराRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement