Advertisement

बाबांनो शब्द जपून वापरा!, म्हणताहेत खुद्द अजित पवार


बाबांनो शब्द जपून वापरा!, म्हणताहेत खुद्द अजित पवार
SHARES
Advertisement

'बाबांनो शब्द जपून वापरा!' नाहीतर अर्थाचा कसा अनर्थ होतो, ते मी स्वत: अनुभवलं आहे... या अनर्थापायी बरंच काही सहनही करावा लागलं आहे, त्यानंतर अत्यंत संयम ठेवून इथपर्यंत आलो आहे. असा सल्ला दिला आहे तो, कुणाचीही तमा न बाळगता अतिशय परखडपणे मत मांडणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी.

पण हा सल्ला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आपल्या सहकाऱ्यांना दिलेला नसून तो त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना दिला आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबद्दल 'साला' हा शब्द वापरायला नको होता. आमच्याकडून ती चूक झाली म्हणूनच आम्ही विरोधी बाकावर बसलो. तशी तुमची जीभ घसरू देवू नका, असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी विधानसभेत जीएसटीवर चर्चा सुरू असताना दानवे यांना दिला.

काही वर्षांपूर्वी वादग्रस्त विधान केल्याने अजित पवार यांच्यावर चोहोबाजूने टीका करण्यात आली होती. या वक्तव्यामुळे अडचणीत आलेले अजित पवार यांनी कराडमध्ये एक दिवसाचे आत्मक्लेश उपोषणही केले होते.

संबंधित विषय
Advertisement