Advertisement

बातम्या पेरण्यात काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात - राणे


बातम्या पेरण्यात काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात - राणे
SHARES

मुंबई - मी कोणत्याही पक्षात जाणार नाही, माझ्या बद्दल ज्या बातम्या पसरविल्या जात आहेत. मला बदनाम करण्यात येत आहे. या सगळ्या अफवा असल्याचे सांगत नारायण राणे यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांवर टीका केली. काँग्रेसमधील काही नेतेमंडळी हे कटकारस्थान करत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली. माझ्याबद्दल ज्या काही बातम्या येत आहेत, त्या चुकीच्या आहेत. मी शिवसेनेत, तर कधी भाजपामध्ये जातोय अशा बातम्या येत आहेत. माझ्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरविल्या जात आहेत. या बातम्या पेरण्यामागे काँग्रेसच्या काही नेत्यांचे षडयंत्र सुरु असल्याचेही ते यावेळी म्हणालेत. तसेच राणे यांचा संघर्ष करणे हा पिंड आहे. त्यामुळे यापुढेही संघर्ष करत राहणार, असा इशारा राणे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे त्याचा अर्थ मी भाजपात जाणार असा होत नाही. मला आणि माझ्या कुटुंबाला डावलले जात आहे, असा प्रहार नारायण राणे यांनी यावेळी केला. 

नितेश राणे हे आक्रमक आहेत. कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका मांडली. ती भूमिका योग्य आहे. जर त्यांना याबाबत निलंबित केले तर मला काहीही वाटत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसे झाले तर मला वाईट वाटणार नाही. आज सरकारकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांनी 19 आमदारांना निलंबित केले आहे. एक-दोन किंवा 5 आमदार निलंबित केले तर ठिक आहे. 19 आमदार निलंबित केले यावरुनच स्पष्ट होत आहे, त्यांच्याकडे बहुमत नाही. अर्थसंकल्प पास होण्यासाठी यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांनी ही सुडाची कारवाई केल्याची टीका नारायण राणेंनी केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा