काँग्रेसमध्ये नाराज असलेले नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असली, तरी आमदार नितेश राणे आणि राणेसमर्थक आमदार कालिदास कोळंबकर हे दोघेही काँग्रेसमध्येच शड्डू ठाेकून आहेत. काय आहे या राणेंच्या राजकीय खेळीमागचे गणित? चला जाणून घेऊया...
गुरूवारी २१ सप्टेंबरला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस सोडल्याचे जाहीर केले. या महत्त्वपूर्ण घटनेवेळी त्यांचे पूत्र व काँग्रेस आमदार नितेश राणे तेथे गैरहजर होते. केवळ खा. निलेश राणे वडिलांसोबत कोकणात आहेत. निलेश यांनीही काँग्रेसच्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे.
राणेंच्या या खेळीमागे नेमके काय राजकारण आहे यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाशी हातमिळवणी करून काँग्रेसबरोबरच शिवसेनेला टार्गेट करण्याबरोबरच नितेश व कालिदास कोळंबकरांची आमदारकी टिकवण्याचा हेतू यामागे आहे. तसेच, संख्याबळ कमी न झाल्याने काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पदही अबाधित राहील आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षनेते पद मिळणार नाही, असाही डाव यामागे असल्याचे सांगितले जात आहे.
भाजपा हुलकावण्या देत असल्याने नाराज राणे स्वतःचा नवीन राजकीय गट स्थापन करण्याची सर्वत्र चर्चा होती. परंतु 'मुंबई लाइव्ह'ने दिलेल्या वृत्तानुसार राणे यांनी स्वत:चा राजकीय गट स्थापन करण्याची घोषणाही यावेळी केली नाही. पुढेही तशा कुठल्याही हालचाली नसल्याची माहिती 'मुंबई लाइव्ह' ला सूत्रांनी दिली आहे.
नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडले असले, तरी ते भाजपाच्या दृष्टीने हिताचेच ठरणार आहे. कारण राणे विशेषतः शिवसेना आणि काँग्रेसलाच लक्ष्य करतील, असे सध्याचे चित्र आहे.
हेही वाचा -
नारायण राणे यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)