डॉ. नरेंद्र जाधव यांचं अर्थसंकल्पावर विश्लेषण

 Sawarkar Hall
डॉ. नरेंद्र जाधव यांचं अर्थसंकल्पावर विश्लेषण

दादर - ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी 2017 च्या अर्थ संकल्पाचे विश्लेषण दादरच्या सावरकर सभागृहात 2 फेब्रुवारी रोजी केले. सावरकर स्मारकाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावर्षीचा अर्थसंकल्प हा ऐतिहासिक अर्थसंकल्प आहे. कारण यावेळेस केंद्रीय आणि रेल्वे अर्थसंकल्प एकाच वेळेस जाहीर केले गेले. मुख्य म्हणजे शेतकरी आणि सर्वसामान्यांसाठी हा महत्त्वाचा असा अर्थसंकल्प आहे.

तेलाच्या किंमती आणि व्याजदर या सगळ्या गोष्टी या अर्थसंकल्पात लक्षात घेऊन तो मांडला गेला आहे. त्याचबरोबर नोटबंदीचा निर्णय लक्षात घेऊन अनेक तरतुदी या अर्थसंकल्पात केल्या गेल्या आहेत. डिजिटल इंडिया, शेतीचा प्रस्ताव, रोजगार निर्मितीला चालना, रेल्वे तसेच पायभूत सुविधा या सर्व गोष्टींना विसंगत अर्थसंकल्प यावेळेस मांडला गेला असल्याचं मत नरेंद्र जाधव यांनी मांडले. या वेळी विद्यार्थी, व्यवसायिकांबरोबरच अनेक नागरिक उपस्थित होते.

Loading Comments