Advertisement

बेजबाबदार वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नोटीस पाठवणार - नवाब मलिक


बेजबाबदार वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस नोटीस पाठवणार - नवाब मलिक
SHARES

इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणी अटक झाल्यानंतर काही वाहिन्यांनी जाणूनबुजून इकबाल कासकरचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांशी असल्याचे बेजबाबदार वृत्त दिले होते. असे तथ्यहीन वृत्त देणाऱ्या वाहिन्यांना राष्ट्रवादी काँग्रेस कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. ज्या वृत्तवाहिन्या आपली चूक लक्षात घेऊन माफी मागणार नाहीत त्यांच्याविरोधात खटला दाखल करू, असे सूतोवाचही नवाब मलिक यांनी केले.


याबाबत माहिती देताना मलिक म्हणाले की, इकबालच्या अटकेनंतर ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अटकेचा सर्व तपशील दिला होता. त्यामध्ये त्याने कुठेही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा आमच्या पक्षातील नेत्यांची नावे घेतलेली नव्हती. तरीही काही वाहिन्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे घेऊन बेजबाबदारपणे बातमी चालवली. तब्बल ४० वृत्तवाहिन्यांचे व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवले आहेत. ज्या वाहिन्यांनी जाणूनबुजून बातमी चालवली, त्यांना नोटीस पाठवण्यात येईल. वाहिन्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर खटला दाखल करण्याची तयारी पक्षातर्फे केली जाईल, असे मलिक यांनी सांगितले.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा