Advertisement

भाजप नेत्यांच्या मागण्या फक्त राजकारणासाठी, नवाब मलिकांचा टोला

महाराष्ट्रातील भाजपचे नेते केवळ राजकारणासाठी विविध मागण्या करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

भाजप नेत्यांच्या मागण्या फक्त राजकारणासाठी, नवाब मलिकांचा टोला
SHARES

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा लॉकडाऊन लावलं होतं, त्यावेळेस कुणालाही विश्वासात घेतलं नाही. कोणाच्याही खात्यात पैसे टाकण्याचा कार्यक्रम केला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे (bjp) नेते केवळ राजकारणासाठी विविध मागण्या करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, भाजपचे नेते सातत्याने लोकांच्या खात्यात पैसे टाका म्हणून सांगत आहेत. ते ज्या पद्धतीने राजकारण करत आहेत, ते योग्य नाही. जेव्हा पहिल्यांदा लाॅकडाऊन लावण्यात येत होतं, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणालाही विचारात घेतलं नव्हतं. कुणाच्याही खात्यात पैसे टाकण्याचा कार्यक्रम त्यांनी राबवला नाही. त्यामुळे केवळ बाेलण्यापेक्षा राज्यातील जनतेचा जीव वाचवण्यासाठी जे गरजेचं असेल तो निर्णय राज्य सरकार निश्चितपणे घेईल. 

हेही वाचा- राज्यात पुढच्या २ दिवसांत लॉकडाऊन लागण्याचे संकेत

आजूबाजूच्या राज्यांनी आपापल्या राज्यातील जनतेला मदत केली. परंतु महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे, जिथं सरकारने जनतेला कुठलीही मदत केली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावर भाष्य करताना नवाब मलिक यांनी सांगितलं, पॅकेज जाहीर करुन कर्जबाजारी व्हा, असं पंतप्रधान मोदी जी म्हणतात. पण महाराष्ट्रातील (maharashtra) बांधकाम मजुरांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले होते. राज्यातील गरीब आणि मजुरांना लाॅकडाऊनच्या वेळेत ४ महिने दोन वेळच्या जेवणाची सोय सरकारने केली होती. 

ज्या गुजरात राज्याचं देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) उदाहरण देत आहेत, त्या गुजरातमध्ये लोकं हाॅस्पिटलअभावी मरत आहेत. गुजरातमध्ये काय परिस्थिती आहे, हे त्यांनी पाहिली पाहिजे. उलट महाराष्ट्रात ज्या पद्धतीने काम सुरु आहे, त्याचं कौतुक मोदी जी करत आहेत. आयसीएमआर कौतुक करत आहे.

उत्तर प्रदेशमध्ये राम भरोसे कारभार सुरु आहे. चाचण्या तर होतच नाहीत. RT-PCR चाचण्या केल्या जात नाही आहेत. ९० टक्के कुठेतरी अँटीजेन टेस्ट करत आहेत. जर त्यांनी व्यवस्थित टेस्टिंग केली, तर परिस्थिती वेगळी होऊ शकते. महाराष्ट्रातून जेव्हा मजूर त्यांच्या राज्यात गेले तेव्हा महाराष्ट्र सरकार जिंदाबाद, मुख्यमंत्री जिंदाबाद अशा घोषणा देत होते. तिथं गेल्यावर तिथल्या सरकारचा निषेध करत होते, अशी बाजू नवाब मलिक यांनी मांडली.

(nawab malik reply devendra fadnavis on economic package in maharashtra)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा