Advertisement

नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक


नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
SHARES

मुंबई - केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, या नोटाबंदीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी सोमवार 9 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने संपूर्ण राज्यात जिल्हा आणि तालुका पातळीवर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असून, सर्व व्यापार तसेच दैनंदिन व्यवहार मंदावले आहेत. अतिरिक्त कामाच्या बोजामुळे बँकेचे कर्मचारी हैराण झाले आहेत. कामाच्या ताणामुळे आणि एटीएमच्या गर्दीत अनेकांनी आपले जीव गमावले. नोटाबंदीचा सर्वात जास्त परिणाम हा शेती व्यवसाय आणि पर्यायाने शेतकरी बांधवांवर झाला आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमाल रस्त्यावर फेकून आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. नोटाबंदीमुळे संपूर्ण देशात अर्थिक मंदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेच्या या आक्रोशाला आवाज देण्यासाठी 9 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राज्यभरात जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार कार्यालयासमोर संवैधानिक पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संबधित जिल्ह्यातील वरिष्ठ नेते, आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा