SHARE

बोरीवली - पालिका निवडणुकीत झालेल्या दणदणीत पराभवानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी उमेदवारांची भेट घेत विचारमंथन केले. या वेळी त्यांच्यासोबत मुंबईचे प्रदेश अध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंह देखील उपस्थित होते. बोरीवली (पू.) इथल्या राजेंद्रनगरच्या वॉर्ड क्रमांक 14 मध्ये त्यांनी उमेदवारांची भेट घेतली. तसेच निवडणुकीदरम्यान मशीनमध्ये बिघाड झाल्याने गोंधळ झाला होता, त्यामुळे मशीन पुन्हा एकदा तपासलं जाणं गरजेचं असल्याचंही त्या म्हणाल्या. त्यासाठी प्रत्येक पक्षाकडून आवाज उठवला जात आहे, यासाठी कोर्टात जाण्याचीही आमची तयारी असल्याचं त्या म्हणाल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या