Advertisement

शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस, म्हणाले आमच्यावर विशेष प्रेम…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

शरद पवारांना इन्कम टॅक्सची नोटीस, म्हणाले आमच्यावर विशेष प्रेम…
SHARES

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्तिकर विभागाकडून नोटीस (income tax notice) पाठवण्यात आली आहे. यासंदर्भातील माहिती शरद पवार यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पवारांनी कृषी विधेयकावरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. (ncp chief sharad pawar gets income tax notice)

प्राप्तिकर विभागाकडून पाठवण्यात आलेल्या नोटिशीसंदर्भात माहिती देताना शरद पवार म्हणाले की,  २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात मला नोटीस पाठवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही नोटीस पाठवण्यात आली आहे. प्रतिज्ञापत्रातील काही बाबींवर स्पष्टीकरण मागवण्यात आलं आहे. उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड भरावा लागेल, लवकरच मी या नोटीशीला उत्तर देईन.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल काही तक्रारी आहेत. त्यांच्या पाठोपाठ मला देखील नोटीस आली आहे. सुप्रियालासुद्धा नोटीस येणार असल्याचं कळत आहे. प्राप्तिकर विभागाला आमच्याबद्दल त्यांना विशेष प्रेम असल्याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले.

हेही वाचा - शरद पवार सगळ्या विषयांवर बाेलतात, पण मराठा आरक्षणावर गप्प का?

कृषी विधेयकांवरील चर्चेदरम्यान गोंधळ घातल्याने काही सदस्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यावर शरद पवार यांनी सांगितलं की, एखाद्या विधेयकावर सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होणं अपेक्षित असतं. विधेयकं तातडीने मंजूर करण्याकडे सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता. हे नियमाविरोधात असल्याचं सभापतींना सांगण्यात येत होतं. त्यासाठी काही सदस्यांनी वेलमध्ये धाव घेऊन नियमाचं पुस्तक वारंवार दाखवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यावर ते फाडण्याचा प्रकार घडला. कुणाचंही म्हणणं ऐकून न घेता सभापतींनी आवाजी मतदान घेतलं. त्यामुळे साहजिक सदस्यांची प्रतिक्रिया तीव्र होती. 

काही सदस्याचं निलंबन करण्यात आलं. या सदस्यांनी निलंबनाचा विरोध म्हणून अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. 

 हेही वाचा - शरद पवारांकडून ‘ती’ अपेक्षाच नाही, चंद्रकांत पाटील यांची टीका


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा