Advertisement

“माझी चूक झाली”, शरद पवार पत्रकार परिषद साेडून निघून गेले

व्हायरल झालेल्या पत्रावरून भाजप नेत्यांकडून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. यावरून पत्रकारांनी सातत्याने प्रश्न विचारल्याने अखेर संतप्त होऊन शरद पवार पत्रकार परिषद सोडून निघून गेल्याची घटना घडली.

“माझी चूक झाली”, शरद पवार पत्रकार परिषद साेडून निघून गेले
SHARES

केंद्रातील आघाडी सरकारच्या (UPA) काळात केंद्रीय कृषी मंत्रीपदाचा कार्यभार सांभाळत असताना शरद पवार (sharad pawar) यांनी कृषी कायद्यात मोठ्या बदलाची गरज व्यक्त करत अनेक राज्यांना पत्र लिहिलं होतं. हे पत्र व्हायरल झाल्यानंतर या पत्रावरून भाजप नेत्यांकडून शरद पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. यावरून पत्रकारांनी सातत्याने प्रश्न विचारल्याने अखेर संतप्त होऊन शरद पवार पत्रकार परिषद सोडून निघून गेल्याची घटना घडली.

शरद पवार केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोहोचले होते. त्यांच्यासोबतच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना त्यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल विचारण्यात आलं. यावेळी ते म्हणाले की, मी कृषीमंत्री असताना कायद्यातील सुधारणांसंदर्भात राज्यांना पत्र लिहिलं होतं, यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण त्यात केंद्राने आणलेल्या तीन नव्या कृषी विधेयकाचा कुठेही उल्लेख नाही. ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे, त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. 

हेही वाचा- महाविकास आघाडीला जनतेने स्वीकारलं- शरद पवार

केवळ विषय भरकटवण्यासाठी हे उद्योग केले जात आहेत. त्यामुळे त्याला जास्त महत्व देऊ नका. आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं तरीही पत्रकारांनी शरद पवार यांना वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने ते संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.

याआधी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी शरद पवार यांच्या जुन्या पत्राचा उल्लेख केला होता. ऑगस्ट २०१० मध्ये शरद पवार यांनी लिहिलेल्या पत्रात शेती क्षेत्राचा संपूर्ण विकास, रोजगार आणि आर्थिक प्रगतीसाठी चांगल्या बाजाराची आवश्यकता असल्याचं त्यांनीच सांगितलं होतं. शरद पवार यांनी ऑगस्ट २०१० आणि नोव्हेंबर २०११ या काळात सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविलं आणि त्यात एपीएमसी कायद्यात सुधारणांवर भर दिला होता. बाजारपेठ सुविधा क्षेत्रात खाजगी सहभागाला प्रोत्साहन देण्यावर त्यांचा भर होता. 

काँग्रेस पक्षाच्या २०१९ च्या घोषणापत्रात उल्लेख. त्यात काँग्रेसने (congress) स्पष्टपणे म्हटलं होतं की, काँग्रेस सत्तेत आल्यास बाजार समित्यांचा कायदा निरस्त करण्यात येईल आणि शेतमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था उभी करण्यात येईल. ज्या सुधारणा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झाल्या, त्या आता देशपातळीवर झाल्या तर विरोध का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

(ncp chief sharad pawar letter controversy on new farm bill)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा